लखनौ-ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी भारतात राहण्याची भीती वाटते असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील एका नेत्याने तर चक्क त्यांच्यासाठी पाकिस्तानची तिकीट बूक केली आहे. तुम्हाला भारतात राहणे भीतीदायक वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जा असे त्याने म्हटले आहे व तिकीट देखील बूक करून दिली आहे.
अमित जानी असे या नेत्याचे नाव आहे ते उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. अमित जानी यांनी नसरुद्दिन शहा यांच्यासाठी १४ ऑगस्ट २०१९ची तिकीट बूक केली आहे. १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वतंत्र दिवस आहे.