नांदगावात अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक : महसूल विभागाकडून धडक कारवाई

0

बोदवड : तालुक्यातील नांदगावजवळ अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक हेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाने धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली. नांदगाव शिवारातील गट नंबर 86 मधील मुक्ताईनगर-बोदवड रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करताना डंपर, ट्रॅक्टर तसेच पोकलॅण्डचा वापर होत असल्याचे आढळून आले असून तहसीलदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महूसल विभागाने कारवाई केली.

दोषींवर दंडात्मक कारवाई होणार
नाडगाव परीसरात (डंपर क्रं.एम.एच.27 एक्स.1255), ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.18 झेड.8101) व (एम.एच.19 ए.पी.7458) मधून पोकलॅण्ड मशीनद्वारे साडेपाच ब्रॉस मुरूमाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वाहन चालकाकडे गौण खनिज वाहतुकीबाबत परवाना नसल्याने दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई तहसीलदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोदवड तलाठी निरज पाटील, शेलवड तलाठी मंगेश पारीसे, राजूर तलाठी विनायक नाईक आदींनी केली.