नांदगाव तालुक्यातील मनमाडमध्ये पाच ते सहा गणेश भक्त जखमी

नांदगाव/ भुसावळ प्रतिनिधी दि 20 नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड मध्ये दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी मंगळवारी सुसाट कारने दिलेल्या धडकेत गणेश मूर्ती घेण्यासाठी आलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीसह पाच ते सहा गणेश भक्त जखमी झाले असून रिक्षासह चार ते पाच दुचाकींचे देखील नुकसान झाले आहे.

मनमाड – नांदगाव रोडवरील गणेश मूर्ती विक्री केंद्रा समोर हा भीषण अपघात झाला. कारचालक हा नांदगावचा असून गणेश मूर्ती घेऊन नांदगाव कडे जात असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींवर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.