नांदगाव, मजगावचा वीज पुरवठा सुरळीत होणार

0

मुरुड : मुरुड शहराला ज्या प्रमाणे भालगाव फिडर वरून वीज पुरवठा केला जातो. त्याच प्रमाणे नांदगाव व मजगावसाठी सुद्धा हा वीज पुरवठा होण्यासाठी या लाईनवर असणार्‍या जुन्या विद्युत वाहिनी बदलण्याचे काम जोरदार सुरु असून सदरील कामासाठी 15 दिवसाचा अवधी द्यावा तदनंतर या भागात विजेचा पुरवठा सुरळीत झालेला असेल मुरुड शहर व्यतिरिक्त अतिरिक्त पुरवठा येथील वीज वाहिन्या घेऊ शकत नसल्याने सदरची लाईन लवकरच बदलून सदरील समस्या नष्ट करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे आश्वासन मुरुड वीज कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी मुरुड पोलीस ठाण्यात संपन्न झालेल्या सभेत केले आहे.

लेखी आश्वासनामुळे चिंतामणी जोशी यांचे उपोषण मागे
चिंतामणी जोशी हे उपोषणास सुरुवात करणार होते परंतु मुरुड पोलीस ठाण्यात वीज मंडळ अधिकारी व नागरिकांची सभेचे आयोजन पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी करून वीज कार्यलयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून सदरील संदर्भात लेखी आश्वासन दिल्यामुळे जोशी यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळी झालेल्या सभेत पंचक्रोशीचे अध्यक्ष फैरोज घलटे, मुरुड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष महाडिक, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुरुड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, सुधाकर दांडेकर, श्रीकांत सुर्वे, महेश मापगांवकर, नगरसेवक आशिष दिवेकर, सुदेश वाणी, लहू रावजी, उपसरपंच जितेंद्र दिवेकर, आदींसह असंख्य नांदगाव मजगाव मधील लोकांनी तुफान गर्दी केली होती.