शिरपूर : बोराडी रस्त्यावर नांदर्डे शिवारात भरधाव डंपरने पुढे चालणार्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सासर्यासह जावयाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवार, 4 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात अमृत दयाराम बोरसे (48, कळंबू, ता.शहादा) व नामदेव तुकाराम पाटील (55, रा.मलफा, ता.पानसेमल,मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला.
अपघातात दोघे ठार
शहादा तालुक्यातील कळंबू येथील अमृत दयाराम बोरसे व मध्यप्रदेशातील मालफा येथील नामदेव तुकाराम पाटील हे दोघेजण मोटरसायकलीने मध्यप्रदेशातील मलफा येथून बोराडीमार्गे शिरपूरकडे येत असतांना बोराडी-नांदर्डे गावादरम्यान घाटाच्या खाली भरधाव डंपरने पुढे चालणार्या मोटरसायकलीला मागून जोरदार धडक दिली या धडकेत नामदेव पाटील व अमृत बोरसे दोघे चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघांना गणेश निकुंभ यांनी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मयतावस्थेत दाखल केले असता डॉ.अमोल जैन यांनी दोघांची तपासणी करून मयत केले याप्रकरणी वार्डबॉय नितेश गवळी यांनी खबर दिल्याने शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास राजेंद्र एदांईत करीत आहेत. मयतामध्ये अमृत दयाराम पाटील हे शिरपूर कळमसरे येथील आयटीआय हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.तर दोघे नात्याने चुलत सासरे-जावई असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.