साक्री (रफिक शेख) :- साक्री तालुक्यातील नांदवन येथील ग्रामस्थांनि साक्री तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. नांदवन गावातील स्वस्त धान्य दुकानावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी ग्रामस्थ व शिवसेना तालुका प्रमुख विशाल देसले यांनी पुरवठा विभागाचे तहसीलदार व्ही.डी.ठाकूर यांना जाब विचारला. दुकानदारावर कारवाई होईपर्यत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
काल सायंकाळी साक्री तालुक्यातील नांदवन गावातून स्वस्त धान्य दुकानातील रेशनचा तांदूळ टैक्टर मध्ये भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना भाडणे गावातील BSNL कार्यालयाजवळ तरुणांनी पकडून साक्री पोलिसात जमा केल्याची घटना घडली होती.