अर्जेंटिना : अर्जेंटिना आणि बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आपली लहानपणापासूनची मैत्रीण अँटोनेला रोकुझ्झो हिच्याशी विवाह बंधनात अडकला. वयाच्या 9 व्या वर्षांपासून झालेली मैत्रीची परिणीती शुक्रवारी रोसारीओ येथे झालेल्या शतकातल्या एक अशा विवाह सोहळ्यात झाली. या विवाहासाठी मेस्सीचे या खेळातील सहकारी, जगभरातील सुमारे 150 पत्रकार उपस्थित होते. या दोघांना विवाहाच्याआधीच 4 वर्षीय थिएगो आणि एक वर्षाचा मॅटिओ, अशी दोन अपत्ये आहेत.