रावेर- तालुक्यातील नांदुरखेडा गावात 16 घरांमध्ये वीज चोरी होत असल्याची बाब तपासणीत उघड झाल्याने वीज वितरण कंपनीचे निंबोल कार्यालयाचे सहाय्यक अभियंता तुषार गाजरे यांनी कारवाई केल्याने वीज चोरी करणार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी पी.एस.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरखेडा येथे वीज चोरी करणार्यांविरोधात मोहिम राबविण्यात आली. 16 घरांमध्ये वीज चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. 30 नोव्हेंबरपर्यंत संबंधितांनी दिलेल्या दंडाची भरपाई न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. या मोहिमेत सहाय्यक अभियंता तुषार गाजरे यांच्यासह जयंत बारी व गजानन निंबाळकर यांचा सहभाग होता.