नांदुरमधील शंभू महादेव मंदिराचा कलशारोहण

0

यवत । दौंड तालुक्यातील नांदुर येथे लोकसहभागातून उभारणी करण्यात अलेल्या शंभो महादेव मंदिराचा कलशारोहण जगद्गुरू शंकराचार्य महाराज यांच्या उपस्थित उत्साहात करण्यात आला.याप्रसंगी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, दौंड पंचायत समिती उपसभापती सुशांत दरेकर, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते अशोक बोराटे, पुणे जिल्हा राष्ट्रीवादी महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, पुणे शहर राष्ट्रीवादी महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, पाटेठाणच्या उपसरपंच ज्योती झुरूंगे, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठाणचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, सरपंच निलेश म्हेत्रे, सामाजिक कार्यकते उमेश म्हेत्रे, संचेती वकिल, शिरूर बांधकाम सभापती मंगलदास बांदल, राजेन्द्र टिळेकर, नांदुरच्या सरपंच रेशमा बोराटे नवनिरवाचित सरपंच लतिका थोरात सरपंच पोपटराव बोराटे सरपंच नामदेव बोराटे, जमालुद्दीन शेख, रामदास कोकरे,विठ्ठल घुले संजय थोरात, भानुदास बोराटे, मयूर घुले, अशोक थोरात, राजेंद्र थोरात, कद्दीर शेख, यशवंत थोरात, आप्पासाहेब घुले, रामभाऊ घुले, हेमंत घुले, किशोर बोराटे, गणेश बोराटे, सचिन बोराटे, विकास बोराटे, प्रवीण हिवरकर, अर्जुन थोरात, हिरामण घुले, सखाराम बोराटे, पोपट बोराटे, सुनिल बोराटे, महेश बोराटे, चंद्रकांत बोराटे, प्रमोद थोरात, राजेश बोराटे यशवंत बर्वे, नवनिर्वाचित सदस्य रविंद्र बोराटे, कैलास गायकवाड, नरेंद्र थोरात, नेहा गुरव, भारती बोराटे, सुषमा घुले, निता घुले, शितल बोराटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, आज माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. दौंड मधील नांदुर गावात श्री सोमेश्‍वर मंदिर कलशारोहनाच्य निमित्ताने या पवित्र वास्तुचा उद्घाटन करण्याचा मान मिळाला, लेक म्हणून मिळालेला हा सन्मान आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही. गावातील पहिलेला आनंदोत्सव आजही माझ्या स्मरणात आहे. ट्रस्टचे उपाध्यक्ष पोपटराव बोराटे यांनी सूत्रसंचालन केले.