नांदेडात एलसीबी निरीक्षकांची बदली!

0

नांदेड । नांदेडातील पोलीस अधीक्षक कार्यालयात खूप दिवसांपासून शिजत असलेल्या ’खलबताला’ यश आले आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक आणि न्यायदंडाधिकारी संदीप गुरमे यांची बदली नियंत्रण कक्षात केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जारी केले आहेत. या बदलीच्या निर्णयाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कर्मचार्‍यांनी सुटकेचा निःश्‍वास घेतला आहे. आता या पुढे कोणाचा नंबर लागणार आहे याकडे पोलीस विभाग मोठया आतुरतेने पाहत आहे.एका आरोपीच्या साथीने गुरमे यांचा खेळ खल्लास करण्यात आला असल्याची चर्चा आहे.

विशेष पथकाची स्थापना
फेब्रुवारी 2017 मध्ये संदीप गुरमे यांची नियुक्ती नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत झाली. काही दिवसानंतर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या विशेष पथकाची स्थापना केली. त्यात सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांची नियुक्ती करण्यात आली. चिंचोळकर यांनी आपल्या सोबत काही नव्या दमाचे पोलीस घेऊन बेकायदा धंदयांवर प्रहार केले. तरीही 24 तासात ते धंदे सुरु होत होते. दरम्रान, मुन्ना हा गुरमे एलसीबीचे निरीक्षक होईपर्यंत एलसीबीचा अत्यंत खास खबरी व अधिकार्‍यांचा जवळचा होता. मुन्नावर नांदेड आणि हदगाव येथे दोन गुन्हे दाखल झाले आणि गुरमे वरचढ ठरले. काही बाबी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या नजरेत आल्या त्रांनी गुरमे विरुद्ध आलेल्या सर्व अर्जाची छाननी करून त्यांच्याविरुद्ध चौकशी नेमण्यात आली. त्या चौकशीचे प्रमुख अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांना करण्यात आले. तेथे मुन्ना, चिंचोळकर आणि अनेकांचे जाब जबाब नोंदवण्यात आले. आपल्या विरुद्ध होत असलेली दुकान लावण्याची तयारी पाहून गुरमे यांनी काल सकाळी आजारी रजेवर जात असल्याची नोंद केली. सायंकाळी त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाली.