नांद्रा उपकेंद्रात सुविधांच्या अभावी रुग्णांचे हाल

0

पाचोरा। तालुक्यातील नांद्रा या गावाला लागुन अनेक खेडे आहे. आजुच्या बाजुच्या गावांना नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय उपचारासाठी जावे लागतात. मात्र नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा वाढली असून असुविधे अभावी रुग्णांचे हाल होत आहे. कुरंगी-बांबरुड परीसरातील रुग्ण उपचारासाठी नांद्रा येथे उपचारासाठी येतात. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वेळेवर रुग्णालयात उपस्थित राहत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. एखाद्या रुग्णावर अतिप्रसंग घडल्यास रुग्णांना जीव गमवावा लागेल अशी स्थिती वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी आहे. वैद्यकीय अधिकारीं सोबतच नर्स देखील या ठिकाणी वेळेवर हजर राहत नसल्याचे दिसून येत आहे. अपुरी औषध सामग्री, रुग्णवाहिका, डॉक्टर्स वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना हाल सहन करावे लागत आहे.

फोन लावुन बोलवावे लागते
आरोग्य केंद्रात रुग्ण येतात मात्र वैद्यकीय अधिकारी तसेच नर्स हजर नसतात. अशा वेळी फोन करुन बोलवावे लागते. फोन केल्यानंतरही डॉक्टर अर्धा-अर्धा तास रुग्णालयात येत नाही. त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागते. नांद्रा परिसर खेडेगाव असल्याचे शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. शेतीत काम करतांना सर्प दंश सारखी घटना घडते अशा अतिप्रसंगी डॉक्टर हजर राहत नसल्याने रुग्णांचे जीव धोक्यात आहे.

22 खेड्यासाठी एक रुग्णवाहिका
या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला 22 खेडे लागून आहे. रुग्णालयाकडे केवळ एकच रुग्णवाहिका आहे. महिला प्रसुती, अपघात अशा प्रसंगी रुग्णवाहिकेची मागणी होत असते. मात्र एकच रुग्णवाहिका असल्याने ती वेळेवर उपलब्ध होत नाही. घटनेनंतर वाहनाची शोधा शोध करण्यातच वेळ वाया जातो. एकमेव असलेली रुग्णवाहिका सध्या पंढरपुरच्या सेवेत असल्याने रुग्णांचे अधिकच हाल होत आहे.