लोहारा। मंत्री जलसंपदा लाभ क्षेत्रविकास व वैद्यकीय शिक्षण ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंता श्री.पाटील यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थीतीत नुकतेच नांद्रा कासमपुरा येथील धरणाच्या जागेची पाहणी केली. लोहारा येथील गोल टेकडी धरणाच्या जागेची निवड करण्यात आली. आज प्राथमिक भेट देऊन लवकरात लवकर प्रस्थाव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल असे जाहीर केले. आजच्या या भेटीने सर्व शेतकरी वर्गांकडून समाधान व्यक्त होत आहे.
अधिकार्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती
यावेळी भाजपा लोहारा कुर्हाड गटाचे गट पालक तसेच स्वीय सहाय्यक गणेश गोसावी, भाजपा जेष्ठ नेते तसेच सरपंच सार्वे जामने संजय पाटील, भाजपा जेष्ठ नेते शरद सोनार, पंचायत समिती सदस्य पती कैलास आप्पा चौधरी, कासमपुरा माजी सरपंच नितिन गवळी, नांद्रा येथील डॉ. दिलीप पाटील, लोहारा येथील सुनील क्षीरसागर, राजू भदाणे, डॉ.केयुर चौधरी, कळमसरा सरपंच विनोद निकम यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.