पाचोरा। नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्ण कल्याण सदस्य बैठक जिल्हा परिषद सदस्य पदम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला पंचायत समिती सदस्य ललीतभाऊ वाघ व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ उपस्थित होते. नांद्रा प्राथमिक आरोग्य के्ंरतात रुग्णांना सुविधा पुरविण्यात येत नाही. याबाबत नेहमीची तक्रार असते. बैठकीत अजयकुमार जयस्वाल यांनी वैद्यकिय अधिकारी व सर्व कर्मचार्यांवर रुग्णांना येणार्या अडचणी विषयी प्रश्न विचारत त्यांना खडसावले. बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी देखील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांवर निशाना साधला. डॉक्टर व कर्मचारी स्थानिक निवासस्थानी का थांबत नाही, रूग्ण कल्याणाच्या नावाचा निधी किती येतो, हा निधी कोठे खर्च होतो असा सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आला.
रिक्त पदे भरण्याची मागणी
आरोग्य केंद्रात रिक्त असलेले पद भरण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. साहेबराव पाटील व रविंद्र पाटील यांनी रूग्णांना पुरेशी औषधी व सुविधा उपलब्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली. सुनिल पाटील यांनी आशासेविकांच्या कामाविषयी माहिती मागीतली. तर अजय जैस्वाल यांनी मागील पाच वर्षांचा झालेला खर्चाविषयी शंका उपस्थित करत रिऑडिट करून पुढील बैठकीत माहिती देण्याची मागणी केली. त सर्व सदस्यांना माहिती देण्याचे सांगितले. पदम पाटील यांनी रूग्णसेविका ड्राईव्हर, नाईट वॉचमन व स्विपरची जागेसाठी योग्य व्यक्तीची सर्व सदस्य समंतीने निवड करून घेतली. तसेच आरोग्य उपकेंद्राची संरक्षण भिंती व इतर सामुग्री विषयी चर्चा केली. नगराज पाटील यांनी आभार मानले.