नांद्रा । येथील माजी सैनिक स्व .भारत सूर्यवंश यांच्या स्मरणार्थ पाणपोईचा शुभारंभ गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. एस. टी. महामंडळाचे वाहक हिरालाल सूर्यवंशी यांनी वडील माजी सैनिक स्व. भारत माधवराव पाटील यांच्या स्मरणार्थ नांद्रा बसस्थानकावर पाणपोई सुरू केली असून तिचे उद्घाटन सरपंच शिवाजी तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच बालू बाविस्कर, योगेश सूर्यवंशी,र विकांत सूर्यवंशी, भगवान साळवे, नाना सूर्यवंशी, महेश गवादे, भावडू पवार, संतोष ब्राम्हणे, किरण सोनार, विनोद बाविस्कर, देविदास तावडे, भगवान सूर्यवंशी, दीपक तावडे, पिन्टू खैरनार, विनोद तावडे, चंदू पाटील, प्रा. यशवंत पवार, राजेंद्र पाटील, नगराज पाटील आदी उपस्थित होते.