नांद्रा । येथील भारतीय सैन्य दलात सिमा सुरक्षा दलातील जवान नरेंद्र कौतिक सुर्यवंशी हे आपल्या देशसेवेच्या 24 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले. निवृत्तीबाबत नांद्रा येथे भव्य स्वागत व वाजत गाजत मिरवणुक काढून महादेव मंदीरावर सेवा पुर्ती सोहळा उत्साहात पार पडला. नरेंद्र सुर्यवंशी यांच्या वडीलांचे वडील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात (कै) लोटन सुर्यवंशी यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याचा इतिहास आहे. श्री.सुर्यवंशी यांचेबाबा (कै) हरीआप्पा सुर्यवंशी यांचा गावावर एक छत्री अम्मल होत असतांना, अशा परीवारातील नरेंद्र सुर्यवंशी यांचा सेवा पुर्ती सोहळा पार पडला.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, रविंद्र सुर्यवंशी, नितीन तावडे, रणजीत पाटील, अरुण पाटील, बापुराव सुर्यवंशी, रामकुष्ण सुर्यवंशी, सुभाष सुर्यवंशी, विश्वंभर सुर्यवंशी, संरपच शिवाजी तावडे, कुंरगी संरपच गजानन पवार, माजी सरपंच सुभाष तावडेउत्तम बाविस्कर,साहेबराव साळवे, पंकज बाविस्कर ,यशवंत पवार साहेबराव तावडे, सखाराम पाटील, नाना नाईक, नगराज पाटील, ग्रा.पं. सदस्य योगेश सुर्यवंशी, गणेश सुर्यवंशी, अमोल तावडे, बाळू बाविस्कर, रविकांत सुर्यवंशी यांच्यासह गावकर्यांची उपस्थिती होती.
सिमेवर देशसेवा व आपले कर्तव्ये बजावतांना असंख्य अशा घटना संकटांचा मी सामना करावा लागत होता. आपल्या गावी सुखरुप आपली 24 वर्षाची सेवा बजवुन सुखरुप घरी परतलो. गावाने व कुटुंबाने माझा सत्कार केला हे पाहुन मी भारावलो.
– नरेंद्र सुर्यवंशी, सेवा निवुत्त सैनिक