नांद्रा येथील महादेव भजनी मंडळाचा सत्कार

0

नांद्रा । येथील महादेव मंदिर भजनी मंडळ दक्षिण भारतातील तिर्थक्षेत्राहुन आपल्या 15 दिवसाच्या प्रवासाहुन सुखरुप परतल्यावर नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर सुर्यवंशी यांनी त्यांचा छोटे खानी सत्काराचा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.कैलास महाराज (कुरंगी), ह.भ.प.गोविंद महाराज (कुरंगी), नांद्रा सरपंच शिवाजी तावडे, प्रा.यशवंत पवार, माजी उपसरपंच सखाराम पाटील, योगेश सुर्यवंशी, शरद तावडे, आदर्श कृषी केंद्राचे संचालक नितिन पाटील, माजी सरपंच सुभाष तावडे, यांच्या सह ग्रामस्थ व महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष बाविस्कर व सर्व विश्‍वस्त मंडळ तसेच पो.पा. किरण तावडे उपस्थित होते.

यांनी नोंदवला सहभाग
यावेळी भजनी प्रतिनिधी संजय सुर्यवंशी, एकनाथ बाविस्कर, बालु तावडे, अमोल तावाडे, किशोर पाटील, राकेश शिंपी, भुषण बाविस्कर, रामदास तावडे, शिवाजी सुर्यवंशी, पुंडलीक सुर्यवंशी, शेखर कुंभार, आबा बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. महादेव भजनी मंडळ हे कुरंगी बांबरुड गटात नावारुपास असुन ते सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कामात आपला हिरारिने सहभाग नोंदवत असतात.