नांद्रा येथे कापूस पिक पहाणी कार्यक्रम उत्साहात

0

नांद्रा – येथील प्रगतशील शेतकरी मनोज पाटील यांचे शेतावर रासी सिड्स प्रा.ली.या कंपनीच्या रासी आरसीएच 659 या कापूस वाणाच्या पीक पहाणी कार्यक्रम घेण्यात आला. या पीक पहाणी कार्यक्रमात शेतकऱ्‍यांना कापूस पिकाच्या व्यवस्थापन व रोग कीड बाबत रासी सिड्सचे विभागीय व्यवस्थापक समाधान खैरनार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातली शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. रासी सिड्सचे विभागीय व्यवस्थापक समाधान खैरनार, अभिमन्यू पाटील व भूषण पाटील पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन केले.

पिकांसदर्भात केले मार्गदर्शन
कापूस पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी शेतकऱ्‍यांनी रोग किडीचा प्रतिबंध वेळीच केल्यास उत्पन्न हमखास वाढते. त्यासाठी शेतकरी वर्गाने उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित करावे. बोंडअळी निर्मूलनासाठी शेतकऱ्‍यांनी कापसाचा फरदड न घेता गहू, हरभरा व भाजीपाला लावल्यास पिकांची फेर पालट होऊन पुढील हंगामात ते नक्कीच फायद्याचे ठरेल, असे त्यांनी विविध ठिकाणच्या प्रत्यक्ष शेतकऱ्‍यांच्या अनुभव व यशोगाथा सांगतांना मत व्यक्त केले. तसेच शेतकऱ्‍यांच्या कापूस वाणा संदर्भातल्या विविध समस्यांना त्यांनी योग्य उपाय सुचवून मार्गदर्शन केले. रासी सिड्स या कम्पणीच्या विविध वाणांची खासियत यावेळी त्यांनी विशद केली.

– फोटो आहे