नांद्रा येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

0

नांद्रा । पाचोरा आमदार किशोर पाटील व पुणे अंधजन मंडळ आणि कांताबाई जैन फांउडेशन द्वारा पुरस्कूत कांताबाई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मोतीबींदु शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कांताई नेत्रालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बिर्जिस पाल, डॉ. प्रमोद जैन, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. संतोष पवार, डॉ. भागवत गोसावी यांनी रूग्णांची तपासणी केली.मोतीबींदू असलेल्या रुग्णांना जळगाव येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठविले.

तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली तपासणी
या शिबिरात 200 रुग्णांची तपासणी कराण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य पदमसिंग पाटील, पप्पु राजपुत, जि.प.सदस्य दिपक राजपुत, गणेश पाटील, रविंद्र पाटील, सुभाष तावडे, विश्वभर सुर्यवंशी, विनोद बाविस्कर, बालु बाविस्कर, प्रकाश पाटील, डि.के.पाटील, राजेंद्र तायडे, शरदसिंग पाटील, किरण पाटील, ग्रामसेवक सतीस सत्रे, अजय जैस्वाल, साहेबराव पाटील, फईम शेख, साहेब बाबु शेख, विलास पाटील, सखाराम पाटील, प्रकाश गवडी, युवराज काळे, कैलास पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, गोविंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ. शिबीरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद चौधरी, औषध निर्माण अधिकारी एस.एम.वाघ, सुधीर सोनकुळ, राजु महाजन, नाना पवार, अनंता जाधव, प्रविण रायगडे, आशा गटप्रवर्तक योगीता वाणी, आरोग्य सेविका माया सोनवणे, आशा सेविका सुनिता पाटील, दिपाली पाटील, मनिषा पाटील, विद्या धनगर, संगिता धनगर, कल्पना पाटील, प्रतिभा पाटील, सुलभा पाटील यांनी या शिबीरासाठी परीश्रम घेतले. आज झालेल्या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुणांना जळगाव येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.