नांद्रा शेत शिवारात ज्वारीचे पीक आडवे झाल्याने फटका

0

नांद्रा । नांद्रा परीसरात 20 सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी पाऊसाने आडवे पडलेले ज्वारीचे कणस शेतातच उगल्यामुळे शेतकर्‍यांना याचा जोरदार आर्थिक फटका बसला आहे. वादळी पावसानंतरही दोन दिवस पाऊस असल्याने जमीनीवर ज्वारीचे पिके आडवी पडली असून आडवे ज्वारीचे कणसातून ज्वारील कोंब आली आहे. या सजावरील तलाठीपद गेल्या वर्षापासुन रिक्त आहे. आज नवीन प्रभारी तलाठीची नियुक्ती देण्यात आली आहे. आजही पंचनामे झालेले नाहीत. आजपासुन पंचनामे सुरु करणात असल्याचे तलाठी कालकर व कुर्षी सहाय्यक चेतन बागुल यांनी सांगितले. नांद्रा शिवारातील कापणीवर आलेल्या ज्वारी, बाजरी पिकाचे सर्व प्रथम पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली.

पंचनामे लांबणीवर
20 सप्टेंबर रोजच्या रात्री झालेल्या वादळाची व नुकसानीचे महसुल किंवा कुर्षी विभागाचा कोणताही कर्मचारी या भागात फिरकला नाही. शेतकर्‍यांनी आ.किशोर पाटील यांच्या कडे व तहसिलदार यांच्या पहाणीची मागणी केली. आमदार किशोर पाटील व तहसिलदार श्री कापसे यांनी या भागातील पिकांच्या नुकसानीची पहाणी केल्यावर पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. शनिवार व रविवार पाच दिवस उलटूनही पंचनाम्यांना गती मिळालेली नाही. नांद्रा येथील तलाठी यांनी प्रभारी पदभार स्विकारला असून नुकसानग्रस्थ भागातील पंचनामे करण्यात येणार आहेत.