नागझिरी येथे 75 रुग्णांची आरोग्य तपासणी

0

जळगाव। येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या ग्राम आरोग्य अभियानांतर्गत नागझिरी येथे 75 रूग्णांची तपासणी करण्यात येऊन रूग्णांना उपचारविषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे ग्रामीण भागातील गरजु रूग्णांना तपासणी व उपचाराच्या सुविधा मिळाव्या म्हणुन ग्राम आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे.

या समस्यांवर केले मार्गदर्शन
या अभियानाला ग्रामीण भागातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ग्राम आरोग्य अभियानांतर्गत यावल तालुक्यातील नागझिरी येथे तपासणी शिबीर घेण्यात आले. यात 75 रूग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत स्त्रीरोग, नेत्ररोग, पोटाचे विकार, नाक-कान-घसाचे विकार, गर्भपिशवीसंबंधीच्या समस्या यासह इतर विविध आजारांची तपासणी करून रूग्णांना उपचार विषयक सल्ला दिला जात आहे. त्यापैकी 30 रूग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन
अभियानात डॉ. पवार आणि डॉ. भोसले या तज्ञांची टीम कार्यरत आहे. गरजु रूग्णांसाठी हे अभियान सुरूच राहणार असुन अभियानाचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तपासणीत स्त्रीरोग, नेत्ररोग, पोटाचे विकार, नाक-कान-घसाचे विकार, गर्भपिशवीसंबंधीच्या समस्या यासह इतर विविध आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.