चाळीसगाव – शहरातील नागद रोडवरील अनिलदादा कॉम्पलेक्स समोर लावलेली मोटारसायकल 14 ऑगस्ट रोली लंपास करण्यात आलेली होती. यासंदर्भात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव येथील शेषराव किसन पवार (35) यांनी करगाव येथील विजय राजाराम ठाकरे यांच्याकडुन बजाज सी टी 100 मोटारसायकल क्रमांक एम एच 19 ए डी 8719 ही सन 2010 मध्ये स्टँप पेपरवर करारनामा करुन विकत घेतली होती. शेषराव पाटील हे 14 ऑगस्ट रोजी शेतीचे सामान विकत घेण्यासाठी वरील क्रमांकाची मोटारसायकलवर वडीलंसोबत आले होते. नागद रोडवरील अनिलदादा देशमुख कॉम्प्लेक्स मधील सुजय ट्रेडर्स समोर दुपारी 2 वाजता मोटारसायकल लावून ते बाजारासाठी गेले 3 वाजता परत आले. त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरुन नेल्याची फिर्याद त्यांनी आज दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रेमसिंग राठोड करीत आहेत.