नागपुरच्या रितिकाची दहावीची परिक्षा बर्लिनमध्ये

0

नागपूर । देशासाठी खेळणार्‍या खेळाडूंना बहुतांशी वेळा परिक्षांना मुकावे लागते .मात्र यावेळी तसे झाले नाही. युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू रितिका ठाकेरा ही दहावीची विद्याथीनी आहे. त्यात तीची जर्मन ओपन स्पर्धेसाठी निवड झाल्याने तेथे गेलेली.एकीकडे देशासाठी खेळण्याचा अभिमान तर दुसरीकडे दहावीची परिक्षा या दोन्ही गोष्टी महत्वाच्य असल्याने काय करावे समजत नसतांना परीक्षेला द्यायची व स्पर्धादेखील खेळायची हे दोन्ही सुत्र एकत्र आणून दाखविले.

विविध शासकीय पातळीवरील समन्वय आणि रितिकाची मेहनत यामुळे जर्मनीच्या बर्लिन शहरात दहावीचा पेपर सोडविण्याचे आव्हान रितिका आणि मुंबईतील मालाडच्या रायन इंटरनॅशनल स्कूलची रितिकाची सहकारी खेळाडू सिमरन सिंघी यांनी लीलया पेलले व यशस्वी केले. या दोघींनी पेपर सोडविल्यानंतर सामना खेळला. रितिका व सिमरन यांची डच तसेच जर्मन ओपन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या दोघी क्रमश: दुहेरी आणि मिश्र दुहेरीसाठी संघात आहेत.

10 मार्चला इंग्रजीचा पेपर होता.तो मुलीला परीक्षेला मुकावे लागू नये यासाठी रितिकाचे वडील राहुल यांनी सीडीएस स्कूल, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय बॅडमिंटन संघटना आदींना त्यांनी विनंती केली. रितिका आणि सिमरन यांच्या शाळेच्या प्राचार्यांनी आयसीएसई बोर्डाला कळवून बर्लिनमध्ये दोन्ही विद्यार्थी पेपर सोडवू शकतील का, यावर मार्गदर्शन मागितले.आयसीएई बोर्डाने सकारात्मक प्रतिसाद देत बर्लिनमध्ये पेपर सोडविण्याची परवानगी बहाल केली. बीएआय आणि क्रीडा मंत्रालयाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून बर्लिनमधील भारतीय दूतावासात या दोघींची पेपर सोडविण्यासाठी व्यवस्था केली. दोन्ही विद्यार्थिनींनी पेपर सोडविल्यानंतर सामना देखील खेळला.