नागपूर- नागपूरमध्ये निर्माणाधीन असलेल्या किंग्जवे रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान, या इमारतीत जवळपास १० ते १२ कामगार अडकल्याचे सांगितले जात आहे, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.