नागपुरात शपथ का नाही?

0

मुंबई । भाजपा पारदर्शकतेची शपथ राजधानी मुंबईत घेतात. मात्र राज्याची उपराजधानी असलेली नागपूर येथे शपथ का घेतली नाही? मुंबई आणि पुणे दोनच ठिकाणी तुम्ही पारदर्शकतेच्या शपथा घेतल्या. म्हणजे बाकीच्या महानगरपालिकांत तुम्ही पारदर्शक कारभार करणार नाहीत का?आजच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्म्यांची आठवण का येत आहे? मग दोनच ठिकाणी तुम्ही शपथा का घेतल्या? बाकीच्या महानगरपालिकांत तुम्ही पारदर्शक कारभार करणार नाहीत का? तिकडे का नाही शपथा घेतल्या मग? नागपूरमध्ये का नाही घेतली? नागपूर तर खूप मोठ्या घोटाळ्यांचे आगार झाले आहे. अशा शब्दात शिवसेना प्रक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य करित मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.

शिवसेना हीच मुंबईची ताकद

ज्या हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान केले त्या हुतात्मा स्मारकासमोर जाऊन तुम्ही पारदर्शकतेची शपथ कशाला घेता ? मग शपथ घ्यायला हवी होती की, हा संयुक्त महाराष्ट्र मी अखंड ठेवीन आणि मुंबई तर सोडाच, पण महाराष्ट्राच्या भूभागाचा एक इंचसुद्धा तुकडा आम्ही तुटू देणार नाही. सीमा भाग जो कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे तो भूभागसुद्धा आम्ही आमच्या सत्तेच्या काळात पुन्हा महाराष्ट्रात आणू.मुंबईत हुतात्मा स्मारक आणि पुण्यात सिंहगडावर जाऊन नुकतीच भाजप उमेदवारांनी पालिकेत पारदर्शक कारभाराची शपथ घेतली. त्याची खिल्ली उडवताना, महाराष्ट्र तोडायची भाषा करणारे हुतात्मा चौकावर जाऊन नौटंकी करतात. 92 च्या दंगलीत सगळ्यांच्या शेळ्या झाल्या होत्या. तेव्हा शिवसैनिकच येथे वाघासारखा लढला. शिवसेना हीच मुंबईची ताकद आहे. ही मुंबईची ताकद खच्ची केली तर आपल्याला मुंबई विनासायास मिळेल अशी स्वप्ने पाहणारे जे कुणी असतील त्यांचे स्वप्न मुंबईकर कधीच पूर्ण करणार नाहीत.

अच्छे दिन’ आले म्हणून शिंगे फुटली?

गेल्या 25 वर्षांची मैत्री होती ना? लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या खांद्याला खांदा लावून सेनेने प्रचार केला ना? वाईट काळात आपल्याबरोबर राहिलेला मित्र आहे.‘अच्छे दिन’ आले म्हणून तुम्हाला शिंगे फुटली? लागलीच तुम्ही मोठे भाऊ झालात का?

पंतप्रधान झालो तरी मला मुंबई पाहिजे

मुंबई ही आपल्या देशाचं आर्थिक केंद्र मानले जाते आणि आहेच. अशा आर्थिक केंद्रावर आपला ताबा असावा, आपल्या अंगठ्याखाली ही मुंबई असावी अशी स्वप्नं कोणीही…अगदी दिल्लीश्वर मग कोणीही दिल्लीश्वर असो, त्याला नेहमी पडतात. पंतप्रधान झालो तरी मला मुंबई पाहिजे ही मनातली एक अतृप्त भावना असते. ती भावना वेळोवेळी डोकं वर काढते आणि ती नेहरूंपासून कायम आहे. फक्त मोदीच त्याला जबाबदार आहेत असं नाही. नेहरूंपासूनच पंतप्रधानांची ही वृत्ती कायम आहे. नेहरूसुद्धा त्यावेळी मुंबईला केंद्रशासित करा, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे म्हणायचेच ना.