नागपुरात 3 पोलिसांचे निलंबन

0

नागपूर । नागपुरात अपहरण आणि लूट प्रकरणी 3 पोलिस शिपायांवर कडक कारवाई करत थेट निलंबूत करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ही कारवाई केली. शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे अशी निलंबित पोलिसांची नावं आहेत.

8 मार्च रोजी खापा परिसरात एका कारमध्ये 28 लाखांचे जुने चलन (1000 आणि 500 च्या नोटा) घेऊन जाताना दोघे आढळले होते. मात्र, हे तीन पोलिस त्यांना निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि 14 लाख रुपये लूटले होते. तसेच नोटा घेऊन जाणार्‍यांवर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले होते. ही बाब वरिष्ठाच्या लक्षात आल्यानंतर चौकशी झाली. त्यात तिन्ही पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच तिन्ही दोषी पोलिसांविरोधात अपहरण आणि लुटीचा गुन्हा ही नोंदवला आहे.

महत्त्वाचे म्हणजे 7 मार्च रोजी नागपूर पोलिस दलातील सात पोलिसांना अवैध धंद्याना आश्रय देण्याच्या आरोपात निलंबित करण्यात आले होते. आणि आता या 3 पोलिस शिपायांच्यांच्या निलंबनाने आपले पोलिस खाते किती बेजबाबदार आहे याचे दर्शन घडते.