नागपूर : नागपूरचे पावसाळी अधिवेशन एक दिवसावर आले असतानाच येथील आमदार निवास भवनात एक मृतदेह आढळून आल्यानी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती हा शिवसेना आमदार रमेश लटके यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगितले जाते. विनोद अग्रवाल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आमदार निवास भवनातील 43 क्रमांकाच्या खोलीत मंगळवारी सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. रमेश लटके हे मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.