नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या महापौरांच्या वाहनावर काल मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने महापौर संदीप जोशी या हल्ल्यातून बचावले आहे. या घटनेवरून भाजपकडून सरकारवर टीका होत आहे. या घटनेवर बोलतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, जर महापौर सुरक्षित राहणार नसतील तर, कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे चालेल? असा प्रश्न उपस्थित करत, या घटनेची गांभिर्याने दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
तसेच यावरून आज विधिमंडळ अधिवेशनात देखील पडसात उमटले. विधानसभेत भाजप आमदारांनी यावरून सरकारला लक्ष करत गदारोळ केला. महापौर संदीप जोशी यांना १२ दिवसांपासून धमक्या देखील येत होत्या. पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.