नागपूर । नागपुरातील तेलंखडी हनुमान मंदिर परिसरात राहणार्या शिंदे कुटुंबातील तिघांनी फुटाळा तलावात शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. मृतकांमध्ये पती, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. निलेश शिंदे (वय 35), पत्नी रुपाली शिंदे (वय 32) आणि मुलगी निहाली शिंदे (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही जवळ असलेल्या फुटाळा तलावाजवळ फिरायला गेले. काही वेळ फिरल्यानंतर निलेश आणि रूपालीनं निहलीसह तलावात उडी घेतली. मात्र, रात्रीची वेळ असल्यानं कुणाला घटनेची माहिती कळली नाही. आज सकाळी तीनही मृतदेह तलावात तरंगताना दिसते. नागरिकांनी पोलिसांना याची लागलीच माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले आणि तीनही मृतदेह बाहेर काढले.