नागपूर, अमरावतीसह वर्धा पॅसेंजर दिड महिन्यांसाठी रद्द

0

बडनेरा विभागात पूल पुर्नबांधणीचे काम ; रेल्वे प्रवाशांची गैरसोय

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील बडनेरा सेक्शनमध्ये पूल पुर्नबांधणीच्या कामासाठी विशेष इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात येणार असून त्यासाठी 16 मे पासून अप-डाऊन नागपूर, भुसावळ, अप-डाऊन नागपूर-वर्धा तसेच अप-डाऊन नागपूर-वर्धा पॅसेंजर 30 जूनपर्यंत (दिड महिन्यांसाठी) रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांसह चाकरमान्यांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे.

या गाड्या झाल्या रद्द
बडनेरा-भुसावळ सेक्शनमध्ये पुलाच्या पुर्न बांधणीच्या कामासाठी गाडी क्रमांक 51286-51285 नागपूर-भुसावळ व भुसावळ-नागपूर पॅसेंजर तसेच गाडी क्रमांक 51260-51259 नागपूर-वर्धा व वर्धा-नागपूर पॅसेंजर तसेच गाडी क्रमांक 51262-51261 वर्धा-अमरावती व अमरावती-वर्धा पॅसेंजर 16 मे ते 30 जूनदरम्यान तब्बल दिड महिना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.