चाळीसगाव । नागपूर येथे पत्रकार रमाकांत कांबळे यांच्या आई व मुलीचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या घटनेचा चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाच्या वतीने निषेध करण्यात आला असुन या घटनेतील सर्व आरोपींना त्वरित अटक करुन कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन 19 फेब्रुवारी 2018 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, सचिव एम.बी.पाटील यांच्यासह रमेश जानराव, मोतीलाल अहीरे, सूर्यकांत कदम, गणेश पवार, दिलीप घोरपडे, मुराद पटेल, शरद पाटील, अनिल शिरसाठ, मंगेश शर्मा, गणेश पाटील, अशोक महाले, विजय गायकवाड आदी पत्रकार बांधव व अजय जोशी, भिकन पवार उपस्थित होते.