नागपूर, वर्ध्यासह अमरावती पॅसेंजर महिनाभर रद्द

0

रेल्वेचा विशेष ब्लॉक ; नागपूर विभागात इंजिनिअरींगची कामे

भुसावळ- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इंजिनिअरींच्या कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला असून 1 ते 31 जुलैदरम्यान नागपूर, वर्ध्यासह अमरावती पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने पॅसेंजर गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवासीवर्गात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांसह विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

या गाड्या झाल्या रद्द
गाडी क्रमांक 51286/51285 नागपूर-भुसावळ व भुसावळ-नागपूर पॅसेंजर तसेच गाडी क्रमांक 51260/51259 नागपूर-वर्धा व वर्धा-नागपूर गाडी क्रमांक 51262/51261 वर्धा-अमरावती व वर्धा-अमरावती पॅसेंजर 1 ते 31 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली. विशेष ब्लॉक प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आवश्यक असून रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.