भुसावळ- नागपूर रेल्वे विभागात विविध तांत्रिक कामांसह दुरुस्तीच्या कामासाठी 22 रोजी ब्लॉक घेण्यात आला असून या दिवशी सुटणार डाऊन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर सह अप 51286 नागपूर-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.