नवी दिल्ली: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा अमलात आणले आहे. या कायद्याला संपूर्ण देशभरातून विरोध दर्शविला जात आहे. कायद्याच्या विरोधात मोर्चे, आंदोलने झालीत. मात्र केंद्र सरकारने या कायद्याचे पूर्णपणे समर्थन केले आहे. कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने सर्व प्रयत्न केले. दरम्यान आता भाजपकडून घरोघरी जाऊन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी जनजागृती केली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत घरोघरी जाऊन नागरिकत्व कायद्याची जनजागृती केली.
विरोधकांकडून या कायद्याच्या विरोधात अजूनही मोर्चे काढले जात आहे. दुसरीकडे भाजप आणि भाजपप्रणीत संघटनेने कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढले. आता भाजपकडून घरोघरी जाऊन कायद्याची माहिती दिली जाणार आहे.