नागरिकत्व कायद्याबाबत मागे वसरणार नाही: अमित शहा

0

जोधपूर: केंद्रसरकारने देशात नागरिकत्व सुधारणा विधेयक कायदा लागू केल्यानंतर देशातल्या विरोधी पक्षांनी कायदा मागे घेण्यासाठी अनेक ठिकाणी धरणे आंदोलन केले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनादरम्यान हिंसक वळण लागले होते. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राजस्थानमध्ये सीएएच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करताना, काँग्रेसला इशारा दिला. नागरिकत्व दूरस्ती कायद्यासंदर्भात सरकार अजिबात मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नागरिकता दूरस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेसने या कायद्याल विरोध केला असून देशात जोरदार आंदोलने होत आहेत. या आंदोलनामध्ये काँग्रेस मोठ्या हिरिरीने सहभागी होत आहे. या कायद्यावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सीएए म्हणजे मुस्लीमविरोधी कायदा असल्याचा अपप्रचारही करण्यात येत आहे. तर, भाजपा नेत्यांकडून हा कायदा मुस्लीमविरोधी नसून देशहिताचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

अमित शहांनी या कायद्याला होणाऱ्या विरोधावरुन पुन्हा एकदा काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांना ठणकावले आहे. देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले तरी, नागरिकता दूरुस्ती कायद्याबाबत भाजपा एक इंचही मागे हटणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केलंय. तसेच, राहुल गांधींना सीएए कायद्यावरील चर्चेसाठी खुलं आव्हानही दिलंय. जर राहुल बाबाने हा कायदा वाचला नसेल तर, मी इटालियन भाषेत या कायद्याचं भाषांतर करुन पाठवतो, असेही अमित शहांनी म्हटले.