नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात आढळून आले आहे. त्या सबंधी राज्यसभेत आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली. देशातील प्रमुख असणाऱ्या विमान तळावर परदेशातून येणाऱ्या नागरिकांची स्क्रिनिंग सुरु आहे. आता ही सुविधा अजून काही विमानतळांवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड इत्यादी देशांच्या प्रवाशांची स्क्रिनिंग अगोदरपासून सुरू आहे. आता परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची स्क्रिनिंग सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेत भारतात कोरोना व्हायरससंबंधी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. ४ मार्चपर्यंत करोना बाधित २९ व्यक्ती आढळल्याचे सांगण्यात आले. याशिवाय कोरोना भारतात फैलावू नये यासाठी या रोगाशी निपटण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनाची माहितीही त्यांनी दिली. इटलीहून भारतात दाखल झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमुळे फैलावल्याचे त्यांनी सांगितले.