मुंबई: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर केला आहे. या कायद्याला देशभरात विरोध होत आहे. मात्र केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान या कायद्याविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, माजी आमदार आशिष देशमुख यांनी रस्त्यावर उतरून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला जोरदार विरोध केला. गांधी शांती यात्रा काढून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यात आला.