नागरिकत्व सोडणार्‍यांमध्ये भारतीय अव्वल

0

जगभरातील देशांमध्ये नागरिकत्व सोडून देणार्‍या नागरिकांची संख्या वाढत आहे. यात भारताचा सामावेश झाला आहे. अधिकाधिक नागरिकांनी त्यांचे नागरिकत्व सोडून विदेशी नागरिकत्व स्वीकारल्याच्या देशांच्या रांंगांमध्ये भारताचा सामवेश झाला आहे. सन 2015मध्ये 1 लाख 30 हजार भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडून देत विदेशाचे नागरित्व स्वीकारले आहे. त्या नागरिकांनी आधी विदेशातील वर्क विझा घेतला होता.

हा वर्क विझा घेऊन हे भारतीय परदेशात वास्तव्याला होते, कालांतराने त्यांनी त्या त्या देशांचे नागरिकत्व स्वीकारले. इंटरनॅशनल मायग्रेशन आऊटलूकच्या आकडेवारीनुसार मेक्सिकोमधील 1 लाख 12 हजार नागरिकांनी त्यांच्या देशाचे नागरित्व सोडून दिले आहे. फिलिपाईन्स हा देश यामध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. तेथील 94 हजार नागरिकांनी नागरिकत्व सोडून दिले. चीन पाचव्या क्रमांकावर आहे. 2015 मध्ये 78 हजार चीन नागरिकांनी नागरिकत्व सोडून दिले. अहवालानुसार 2015मध्ये जगभरातील सुमारे 20 लाख नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या देशातील नागरिकत्व सोडून विदेशी नागरिकत्व स्वीकारले. 2014च्या तुलनेत हा आकडे 3 टक्के अधिक आहे. परदेशांमध्ये सर्वाधिक भारतीय नागरिक राहत आहेत. त्यांची संख्या 156 लाख इतकी आहे. दुबई, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मन या देशांमध्ये भारतीय अधिक संख्येने राहत आहेत.