शहादा। शहरातील नवीन वसाहतीतील योगेश्वरमध्य रात्री विद्युतपुरवठा खंडीत असल्याचे साधून अदन्यात चार, पाच चोरांनी घरफोडीचा प्रयत्न करीत होते. परंतु रहिवाशींच्या जागृततेने घरफोडीचा प्रयत्न फसला आहे. दोन दिवसापुर्वीच तीन ठीकाणी चोरांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र हातात काहीच लागले नाही. शहरात गेल्या दोन दिवसापुर्वीच डोंगरगाव रेाडावर दोन ठिकाणी व एक गावात घरफोडी व दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला. मात्र त्याठीकाणी चोरांच्या हातात काही लागले नसल्याने त्यांना खाली हात परतावे लागले आहे.
रात्री दिड दोनच्या सुमारास विद्युतपुरवठा खंडीत होता. तसेच मान्सुन पुर्व पावसाने सुरवात केली होती. सर्वच लोक घरात झोपल्याचे चोरांना वाटल्याने त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. शहादा कॉलेजचे प्रा.रामटेक याच्या घराकडे चोरांनी मोर्चा नेला परंतु रामटेक यांना दबक्या आवाजाची चाहुल होताच त्यांनी लाईट लावला आणि कोण आहे असा आवाज काढताच चोरांनी तेथून पोबारा केला आहे. दोन दिवसा पुर्वीच्या घटनेचा तपास लागत नाही तोवरच आज मध्यरात्रीच्या चोरीचा घटनेमुळे नविन वसाहतीतील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण मिर्माण झाले आहे. शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी शहरातील नविन वसाहतीत पोलीसांची गस्त वाढविणे आवश्यक आहे.