चाळीसगाव – नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून नागरिकांनी देखील त्यांच्या जबाबदार्या पाळल्या पाहिजे समाज विघातक कृत्य करणार्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस करते. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त पोलिसांनी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी बुधवार 7 डिसेंबर 2016 रोजी शहर पोलीस स्टेशन अंतर्गत घाट रोड पोलीस चौकीचे नूतनीकरण उद्घाटन प्रसंगी दिल्या.
चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणीसाठी ते चाळीसगाव येथे आले होते. वार्षिक तपासणी झाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार संजय पंजे यांना राष्ट्रपती पुरस्कारासाठी प्रस्ताव त्यांनी मागविला. घाट रोड पोलीस चौकीच्या नूतनीकरण उद्घाटन प्रसंगी बोलतांना त्यांनी सांगितले कि, जिल्हा भरात अनेक जुन्या पोलीस चौक्या आहेत. त्या व्यवस्थित ठेवता येत नाहीत त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे निधीची कमतरता असते या चौक्या नूतनीकरणासाठी दानशूर व्यक्ती पुढे येतात त्यामुळे अश्या चौक्यांचे पुर्नजीवन होते अश्या दात्यांचे त्यांनी आभार मानले.
चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणी साठी पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर सकाळी 9:30 वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांना सर्व प्रथम पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचार्यांचे सेवापट रिमार्क केले. लागलीच पोलीस पाटील यांचा दरबार घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना योग्य त्या सूचना दिल्या त्याच प्रमाणे पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन चाळीसगाव शहर व तालुक्यातील घडामोडींचा आढावा घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या नंतर पोलीस दरबार घेण्यात आला पोलीस दरबार मध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याच प्रमाणे त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. पोलीस वसाहतीमधील घरांबाबत त्यांनी योग्य ती दाखल घेऊन त्यांचे नूतनीकरण अथवा नवीन बांधकामाबाबत संबंधित विभागाला कळविणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. दुपारी 2 वाजेच्या सुमारास घाट रोड पोलीस चौकीचे नूतनीकरण उदघाटन झाल्या नंतर चाळीसगाव शहर वाहतूक शाखा कार्यालयाचे उदघाटन देखील त्यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी केशव पातोंड, अरविंद पाटील, शहर पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, स.पो.नि. राजेंद्र इंगळे, शहर वाहतूक शाखेचे स.पो.नि.सुरेश शिरसाठ, पो.उ.नि. विजयकुमार बोत्रे, युवराज रबडे, प्रशांत दिवटे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.