नागरिकांच्या सहकार्यानेच वाहतूक व्यवस्था सुरळीत

0

निगडी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण आणि वाहनांची वाढती संख्या पाहता भविष्यात वाहतूक व्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी नागरिक आणि पोलीस मित्रांचे सहकार्य मोलाचे आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणि सुरळीतपणा आला आहे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त (वाहतूक) अशोक मोराळे यांनी केले. प्राधिकरणातील खान्देश मराठा हॉलमध्ये निगडी वाहतूक पोलीस विभागातर्फे विविध संस्था, कंपनी प्रतिनिधी, पोलीस मित्र यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात मोराळे बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, दुर्योधन पवार, पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे, रोटरी क्लबच्या शुभांगी कोठारी, प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे विजय पाटील उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान
या प्रसंगी हिरालाल जैन, शीतल पवार, आकाश सेंगर, महेश देशपांडे, महेश कटारिया, किरण चोपडा, संजय साहू, समीर चौबळ, विजय काळभोर, शुभांगी कोठारी, हेमंत कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. बजाज कंपनी, सत्यम ज्वेलर्स, बिग इंडिया ग्रुप, पोलीस प्रवाह टीम, प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती या संस्थांचासुद्धा सन्मान करण्यात आला. पोलीस मित्र विजय पाटील, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, बाबासाहेब घाळी, तुकाराम दहे, मंगेश घाग, विद्या शिंदे, अर्चना घाळी, विजय मुनोत, शिवाजी अडसूळ, बळीराम शेवते, माधव पाटील, नारायण इथापे यांचाही सन्मान झाला.