पिंपरी : प्रत्येक सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांचे एक अतुट नाते आहे. सर्वांच्या सेवेसाठी आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी पोलिस दल सदैव तत्पर असल्याची ग्वाही, संत तुकारामनगर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघमारे यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मायला खत्री, अभिजित गोफन, संजीवन कांबळे, महेश मांजळकर, रामभाऊ बनसोडे, अविनाश चौधरी, गौतम उजागरे, लक्ष्मण पवार, जमीर शेख, लखन काकडे, अल्ताब शेख, अर्जुन बाबर, सतीश भांडेकर, आरती सौदे, किरण माने, नितीन जोशी, दत्ता गायकवाड, मुकेश परिमल आदी उपस्थित होते.
भाडेकरूंबद्दल माहिती पोलिसांना द्यावी
हे देखील वाचा
निलेश वाघमारे पुढे म्हणाले की, पोलिसांनी नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांची माहिती व्हावी व नागरिकांशी संवाद साधला जावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी आपल्या जाणवणार्या अडचणींबद्दल माहिती देण्याची गरज आहे. सोसायट्यांमध्ये कॅमेरे लावण्यावर नागरिकांनी भर द्यावा तसेच भाडेतत्वावर राहणार्यांची माहिती पोलिसांना द्यावी. व्हेरिफिकेशन करुन घ्यावे. भाडेकरूंची माहिती करून घेतली पाहिजे. त्यामुळे भविष्यातील अनेक गोष्टींना आळा बसेल. यावेळी मायला खत्री, संजीवन कांबळे, शंकर वीरकर, अभिजित गोफन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडु खाडे यांनी केले. डी. यु. ठोंगीर यांनी मानले.