नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा द्या

0

अजित पवार यांचे आवाहन

बारामती । आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती शहारात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 1 कोटी 34 हजार खर्चून शहारातील दोन आरोग्य केंद्र बांधण्यात आली आहेत. आमदार अजित पवार यांच्या प्रयत्नातून बारामतीसाठी ही दोन आरोग्य केंद्र मंजूर झाली असून, त्यातील एक केंद्र शहारातील सर्व्हे नं 220 मधील अनंतआशानगर येथे, तर उपनगराध्यक्ष जय पाटील यांच्या प्रयत्नातून तांदूळवाडी येथे दुसरे आरोग्य केंद्र बांधण्यात आले.

जय पाटील यांच्या पाठपुराव्यातून तांदुळवाडीसाठी आरोग्य केंद्रला मंजुरी मिळाली होती. त्याचे भूमिपूजनही जय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. या आरोग्य केंद्रामुळे तांदूळवाडी परीसरातील नागरीकांना आरोग्यच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. तांदूळवाडी आरोग्य केंद्रासाठी 1 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, 2 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, 4 परिचारिका, 2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 2 फार्मासिस्ट, 1 डाटा एण्ट्री ऑपरेटर आणि 1 सहाय्यक परिचारिका यांची नेमणूक करण्यात आली आहे.