नागरीकांना कोट्यवधींचा गंडा : पसार गुन्हेगार जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
आरोपीचा धुळ्यातील आर्थिक गुन्हे शाखेने घेतला ताबा ः जळगावसह धुळे व औरंगाबादमध्ये आरोपीविरोधात गुन्हे
जळगाव : एज्युकेशन फॉर यु कंपनीच्या माध्यमातून नागरीकांना कोट्यवधींचा रुपयांचा गंडा घालणार्या राजकुमार नारायण पाटील (42, कोल्हे हिल्स, जळगाव) यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा परीषदेच्या इमारतीजवळून अटक केली आहे. आरोपीविरोधात धुळ्यातील देवपूर पोलिसात गुन्हा दाखल असून आरोपीला धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.
गोपनीय माहितीवरून अटक
आरोपी राजकुमार पाटील याने एज्युकेशन फॉर यु कंपनीच्या माध्यमातून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला असून त्याच्याविरोधात जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणच्या नागरीकांची कोट्यवधींची फसवणूक केली असून त्याबाबत गुन्हे दाखल आहेत. संशयीत जळगावात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या व धुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे आरोपीचा ताबा देण्यात आला.
यांनी केली आरोपीला अटक
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जालिंदर पळे, उपनिरीक्षक अमोल देवढे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने केली.