नागरी समस्या सोडविण्याची शिवसेनेने केली मागणी

0

भुसावळ । शहरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून गटारी, पथदिवे, रस्ते, पिण्याचे पाणी आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. नगराध्यक्ष रमण भोळे यांना शिवसेनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन सोमवार 23 रोजी देण्यात आले आहे.

उघड्यावर मांसविक्री बंद करावी
80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे तत्व समोर ठेवून शिवसेनेतर्फे नागरीक समस्या सेाडविण्यास प्राधान्य देण्यात आले असून शहरातील उघड्यावर होत असलेली मांसविक्री बंद करुन मांसविक्रेत्यांना पालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या जागेत विक्रेत्यांनी दुकान मांडावे. याबाबत संबंधित विक्रेत्यांना पालिकेने समज द्यावी अन्यथा कारवाई करण्यात यावी, स्मशानभूमितील पथदिवे 15 दिवसांपासून बंद आहे. नागरिकांना अंत्यविधीसाठी रात्रीच्या वेळेस अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील पथदिवे सुरु करण्याची मागणीदेखील निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर नगरसेवक मुकेश गुंजाळ, अबरार ठाकरे, नामदेव बर्‍हाटे, जगन खेराडे, नाना मोरे, मिलींद कापडे, उमाकांत शर्मा, शिवाजी दावभट, निखिल सपकाळे, राहुल सोनटक्के, अरुण धनगर, अक्षय पाटील, सोनी ठाकूर, सुमित झांबरे, बबलू बर्‍हाटे, रामदास सावकारे, परमेश्‍वर चव्हाण आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.