पुणे । तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. नागरी सहकारी बँकांनीही आपल्या पारंपरिक कार्यपद्धतीत कालानुरूप काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे युवा ग्राहकही नागरी सहकारी बँकांकडे आकृष्ट होऊ शकतील. मात्र, हे बदल करताना मूळ उद्देश हरवून चालणार नाही, असा सूर ‘ऑल इंडिया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट’मध्ये व्यक्त झाला.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन व ‘बीटुबी इन्फोमीडिया’तर्फे दुसर्या ‘ऑल इंडिया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट 2018 व प्रदर्शन’ चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. नॅशनल अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर, महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, गुजरात अर्बन बँक फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. एन. जोशी, राजस्थान फेडरेशनचे सीईओ एम. एल. शर्मा, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, सिस्को सिस्टिमचे अब्दुल कादीर, राजगोपाल झंवर उपस्थित होते. या परिषदेस 350 बँकांमधील वरिष्ठ अधिकारी व 30 पेक्षा अधिक वक्ते उपस्थित होते.