नागादेवी पांझर तलावाला मोठी गळती; फुटण्याचा धोका !

0

१ कोटींचा निधी दुरुस्तीवर खर्च; मात्र तलाव फुटण्याचा धोका

जळगाव: गेल्या दहा दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आले आहे. तसेच धरणातील पाणीसाठा वाढला आहे. मात्र यावल तालुक्यातील दहिगाव-सावखेडा व पंचकोशीतील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले नागादेवी पाझर तलावाला संततधार पाऊसामुळे गळती लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तलावाला गळती लागल असून हा पाझर तलाव ओव्हर फ्लो झाले आहे. मात्र ओसंडून वाहत असल्याने पाझरच्या खालील भागातुन पाण्याची गळती होत असल्याने सावखेडा गावाला धोका निर्णाण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत हे पांझर तलाव तयार करण्यात आले होते. हीबाब प्रशासनाला कळल्यानंतर तत्काळ जिल्हा परिषदेचे अधिकारी, प्रांत अधिकारी डॉ.अजीत थोरबोले, यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी तात्काळ या ठिकाणी पहोचले.

विशेष बाब म्हणजे चार महिन्यापूर्वी नागादेवी पाझर तलावाचे सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून दुरूस्तीचे काम करण्यात आले. मात्र त्यानंतरही तलावाला गळती लागली असल्याने ठेकेदाराने केलेल्या या कामांवर व गुणवतेबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. १ कोटींचा निधी खर्च होऊनही नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो आहे. दुर्दैवाने काही हानी झाली तर याला प्रशासन जबाबदार राहणार आहे. नागादेवी पांझर तलाव फुटल्यास याचा फटका गावातील नागरिकांना बसणार आहे. नागरिकांवर बेघर होण्याची परिस्थिती यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे.