फैजपूर :- नागादेवी पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी यावल तालुक्यातील शेतकर्यांनी आमरण उपोषण छेडले होते मात्र आमदार हरिभाऊ जावळे यांनी या संदर्भात वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकर्यांनी उपोषण मागे घेतले होते. आमदार जावळेंनी दिलेला शब्द खरा केला असून त्यांच्यासह आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने तीन तलावांच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधीसह मंजुरी दिली ओत.
त्यात नागादेवी पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी 94.35 लक्ष, डूकरणे पाझर तलावासाठी 69.22 लक्ष तर सत्रसेन पाझर तलाव 43.45 लक्ष निधीची प्रशासकीय मान्यतेसह मंजुरी देण्यात आली. येत्या काही दिवसातच या कामांची अल्प कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्याअगोदर हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, आमदार हरिभाऊ जावळे यांनी अधिवेशनात पाझर तलावासाठी निधी उपलब्ध करून द्यावा याबाबत अधिवेशनातदेखील विनंती केली होती.