चिंबळी : नागेश्वरनगरमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाने चार महिला बचत गटांचे उद्घाटन नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बोराटे, निलेश बोराटे व डॉ. तृप्ती परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भोसरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब बनकर, मंगेश हिंगणे, उद्योजिका राजश्री गागरे, पूजा वायचळ आदी उपस्थित होते. यावेळी आदर्श बचत गटांचा सत्कार करण्यात आला. बचत गटांना उद्योग, व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या विजया आल्हाट, सुरेखा बनकर, शीतल मानकर, सपना घाडगे, मनिषा गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.