नाट्यकलाकार हा समाजाचे देणे लागतो

0

जळगाव । जीवनात मानवाच्या अंगी कला असणे आवश्यक आहे. प्रत्येकांच्या ठायी कलागुण असतात मात्र त्यांचे प्रकटीकरण व्हायला हवे. कलाकार कलेसाठी आपले संपुर्ण आयुष्य झोकून देत असतो. नाट्यकलाकार हा समाजाचे देणे लागतो. चांगला माणूसच यशस्वी कलावंत होतो. यासाठी सातत्याने प्रयत्नशील असायला हवे. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने बघून स्वप्न पूर्तीसाठी जिद्द आणि चिकाटी ठेवत कष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे असा सूर नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मान्यवरांमधून निघाला. जननायक थिएटर आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तसेच भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने रोटरी भवनात जळगाव शहरातील पहिले राष्ट्रस्तरावरील दिवसीय निवासी कम्प्लिट थिएटर वर्कशॉप पार पडले.

प्रशिक्षणात सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र
समारोपप्रसंगी मंचावर दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रतिभा शर्मा आणि मुख्य नाट्य प्रशिक्षक प्रवीणकुमार गुंजन, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष योगेश भोळे, सामाजिक कार्यकर्ते गनी मेमन, संजय काबरा, सूरज चौधरी, जैन उद्योगसमूहाचे व्यवस्थापक अनिल जोशी उपस्थित होते. नटराजपूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी प्रशिक्षण घेतलेल्या सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित केली. रोटरी वेस्टचे सचिव संजय इंगळे, डॉ.राजेश पाटील, फिरोज पिंजारी, अ‍ॅड.रवी गुजराथी, अ‍ॅड.वासुदेव बुधुखले, फरीद खान, सुरेश चौधरी, नितीन भोसले, विजय शिंपी, योगेश हिवरकर, संतोष खोपडे, सोनल चौधरी तसेच आमदार सुरेश भोळे, नगरसेवक सुनील माळी, नरेंद्र चव्हाण, रवींद्र धर्माधिकारी, विजय जैन यांनी सहकार्य केले. स्वामी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जननायकचे प्रमुख होनाजी चव्हाण यांनी आभार मानले.