पालघर : पालघर जिल्ह्यातील मह्त्वाचा प्रश्न म्हणजे कुपोषण. अनेक कारणे आहेत या समस्येच्या मुळाशी त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे माहितीचा अभाव. लोकशिक्षणाचा अभाव आज शासन अनेक प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यात सर्वत्र स्तनपान सप्ताह साजरा होत आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा वडराई ने सुद्धा सक्रिय सहभाग घेतला. शाळेच्या शिक्षिका संध्या सोंडे यांनी ’कुपोषणाचा भस्मासूर ’बाहुली नाट्यातून कुपोषणाची कारणे आणि त्या वरील उपाय सादर केले. या प्रसंगी चौरस आहार आणि बाळाचे आरोग्य या संबंधी एक छोटेसे प्रदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रम खूपच रंगतदार झाला. वनिता मेहेर आणि नलिनी राऊत यांनी सर्व मातांना आहाराचे महत्त्व पटवून दिले. तसेच यावेळी सर्व अंगणवाडी सेविकाना मार्गदर्शन केले.